उरण : रामप्रहर वृत्त
बोकडवीरा येथे आगरी-कोळी, कराडी सामाजिक संस्था आणि स्टेप आर्ट्स कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ‘आपल्या उरणचा महोत्सव 2020’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा समारोप माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी
(दि. 5) झाला. या वेळी त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्यांचा सत्कार केला. भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पी. जी. पाटील, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, तालुका अध्यक्ष रवी भोईर, चंद्रकांत घरत, पी. पी. खारपाटील, महोत्सवाचे आयोजक पप्पू सूर्यराव, नगरसेवक संजय भोईर, धनाजी ठाकूर, भाजपचे मुरबाड तालुका अध्यक्ष जयंत सूर्यराव, विकी पाटील आदी उपस्थित होते. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले होते.