पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जनहित संवर्धक मंडळ, कच्छ युवक संघ, युवानाद, रुधिरसेतू, सन्मित्र मंडळ व श्रीकृष्ण सांस्कृतिक मंडळ यांच्या सहकार्याने व लोंढे व ओझे कुटुंबीयांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन 2 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.
नगरसेविका स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या तिसर्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर पनवेलमधील श्री. विरूपाक्ष मंगल कार्यालय येथे 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहे. नावनोंदणीसाठी हीींिीं://षेीाी.सश्रश/लऋहगुज्ञढकषतॠज्ञनक्षथक8 या वेबसाईटवर दिलेला फॉर्म भरून आपण आपले नाव रक्तदानासाठी नोंदवावे आणि आपल्या मित्रमंडळींनासुध्दा रक्तदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.