खालापूर : प्रतिनिधी
माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानांतर्गत सोमवारी (दि. 26) खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 27 किशोरवयीन मुली, 49 गरोदर माता तसेच 22 स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. खालापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद रोकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सिमा पाईकराव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित झुरे आणि नयन परब यांच्यासह केंद्राचे कर्मचारी, आशा सेविका आणि लाभार्थी महिला या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.