खोपोली : प्रतिनिधी
रणगाडे, अग्नीबाण, पाच हजार किमीपर्यंत मारा करणारी मिसाईल तसेच अत्याधुनिक आयुधे भारताने बनवली आहेत व बाहेरील देश त्यांची आपल्याकडे मागणी करीत आहेत, त्यामुळे आत्मनिर्भर भारत हे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी खोपोलीत केले.रोटरी क्लब आणि विज्ञान भारती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली येथील डॉ. रामहरी धोटे शिशुमंदिर शाळेत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर मार्गदर्शन करीत होते. ज्या क्षेत्रात आवड असेल, त्याची संपूर्ण माहिती आपण आजपासूनच घ्यायला सुरूवात करावी, असे आवाहन त्यांनी या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केली.काशिनाथ देवधर हे डीआरडीओ (ऊशषशपलश ठशीशरीलह । ऊर्शींशश्रेिाशपीं जीसरपळीरींळेप) या भारतीय क्षेपणास्त्रे बनवणार्या कंपनीत काम करीत होते. डिग्री, डिप्लोमा, कॉम्प्युटर सायन्स यामध्ये शिक्षण घेऊन आपण डीआरडीओसारख्या क्षेत्रात प्रवेश मिळऊ शकता, असे काशिनाथ देवधर यांनी या मार्गदर्शन शिबिरात सांगितले. या वेळी त्यांनी सर्व आयुधांची माहिती प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना दाखवली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सकिना सईद यांनी केले. रोटरी क्लब अध्यक्ष सुरेंद्र जोशी, विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र टिळक, उपाध्यक्ष अशोक पोतदार, सहसचिव सुनिता चव्हाण, सदस्य संजय पाटील, मधुमिता पाटील, डॉ. रश्मी टिळक, मनीषा नरंगले, अविनाश राऊत, मनोज पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका जान्सी मॅडम यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते. हेमलता देशमुख यांनी आभार मानले.