स्त्री शक्ती फाऊंडेशनची मागणी
पनवेल : वार्ताहर
अत्यावश्यक सेवा देणार्या कर्मचार्यांना कर्फ्यु काळातील दिवसांचा विशेष भत्ता देण्याची स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम यांनी पनवेल महानगरपालिकेकडे केली आहे. आज कोरोनाच्या लढाईत आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर उपाययोजना आखल्या गेल्या आहेत. व एवढी मेहनत घेऊन प्रशासन उत्तम काम करीत आहे. आज प्रशासकीय अधिकारी, पोलीस विभाग व विशेषतः आरोग्य विभागाने जे काम दिवस रात्र करून करत आहात ते खूप कौतुकास्पद आहे. पण आज आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष सफाई कामगार खूप मेहनत घेत आहे. जी औषध फवारणी चालु आहेत त्यावर जे लोक काम करत आहे. सुपरवायजर आणि अन्य सहकारी विशेषतः मेहनत घेत आहे. आज त्यांचे ही कुटुंब आहेत ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटीव्ह निघाले अशा ठिकाणी जेव्हा ही निर्जंतुकीकरण करण्यात येते. पण ह्या वेळी जे लोक निर्जंतुक करणे करतात या लोकांना त्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना हि सेफ्टीकिट देऊनच फवारणी व्हावी.
अत्यावश्यक सेवा देणार्यांनाही आरोग्यासाठी धोका आहेच सर्व ठिकाणी त्यांना फिरावे लागते आहे, कृपया या गोष्टीची दखल घ्यावी या विशेष अत्यावश्यक सेवा देणार्या कर्मचार्यांना कर्फ्यु काळातील दिवसांचा या कर्मचार्यांना विशेष भत्ता देण्यात यावा.
-विजया कदम, संस्थापक-अध्यक्ष, स्त्री शक्ती फाऊंडेशन