पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला. या पंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी (दि. 2) पनवेलमध्ये एक भारत श्रेष्ठ भारत हा देशाच्या विविधतेतील एकता दर्शविणारा महोत्सव रंगला. त्यास प्रतिसाद लाभला.
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत भाजपच्या वतीने देशभरात सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला. या कालावधीत विविध कार्यक्रम झाले. या अंतर्गत रविवारी पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भारतातील विविधतेमध्ये असलेल्या एकतेवर आधारित लोककला व सांस्कृतिक कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उद्घाटन खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते तसेच माजी मंत्री तथा सेवा पंधरवड्याचे प्रदेश संयोजक कृपाशंकर सिंह आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या महोत्सवास भाजपचे उत्तर मुंबई जिल्ह्याचे महामंत्री दिलीप पंडित, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अनिवाश कोळी, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, अॅड. मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, राजू सोनी, अजय बहिरा, समीर ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोर्ईर, राजश्री वावेकर, दक्षिण भारतीय जिल्हा संयोजक श्रीनिवास कोडरू, भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, खजिनदार संजय जैन, सांस्कृतिक सेल जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, प्रतिभा भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, कलाकार, नागरिक उपस्थित होते. या वेळी देशभरातील विविध राज्यांमधील नृत्यांचे सादरीकरण करून विविधतेतील एकतेचे दर्शन घडविण्यात आले.
या वेळी बोलताना खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, छोटा कार्यकर्ता मोठा कसा होईल याचा विचार सर्वांनी करायला पाहिजे तसेच आमदार प्रशांत ठाकूर आंतरात्म्यातून भाषण करून नागरिकांच्या हिताची भाषा करीत असतात, अशा शब्दांत त्यांच्या भाषण शैलीचे कौतुक केले. जुन्या आठवणींना उजाळा देत जेव्हा आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्या वेळी मला समाधान वाटले, असेही त्यांनी सांगितले.
माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी मराठी ही भाषा नसून ही एक संस्कृती आहे. सर्वांनी ती जपली पाहिजे, असे आवाहन केले.
आपल्या भाषणातून संपूर्ण पनवेल उपस्थितांसमोर उतरविल्याबद्दल भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांचा या वेळी खासदार गोपाळ शेट्टी आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …