Breaking News

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी पोर्टल

नवी मुंबई ः बातमीदार

कोरोनामुळे संपूर्ण जग आत्मनिर्भर बनण्याच्या तयारीत आहे. जीवनाश्यक वस्तूंबरोबरच  विद्यार्थ्यांना शिक्षणाची व पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशाची चिंता लागली आहे. यावर तोडगा काढत दिनेश औटी व आतिष दिवाकर या दोन मराठी अभियंत्यांनी तीन वर्षे अथक प्रयत्न करून बुक माय कॉलेज हे वेबसाइट पोर्टल सुरू केले आहे. दिनेश औटी हे नवी मुंबईतील घणसोली, तर आतिष दिवाकर हे बदलापूर येथे राहतात.कॉलेज, महाविद्यालय, आयटीआय, वैद्यकीय, अभियांत्रिकी यांसारख्या विविध संस्थांच्या प्रवेशासाठी कराव्या लागणार्‍या धावपळीमुळे जो वेळ वाया जातो त्यावर या पोर्टलद्वारे मात करता येणार आहे. गर्दी टाळत यापुढे घरबसल्या ऑनलाइन प्रवेशासाठीची गुंतागुंत या पोर्टलद्वारे सोडवून विद्यार्थी आणि पालकांना एकप्रकारे सुटकेचा निःश्वास घेता येणार आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply