Breaking News

भाजप नेते संजय कोनकर यांचे निधन

धाटाव : प्रतिनिधी
रोहा नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी  जिल्हाध्यक्ष संजय कोनकर यांचे सोमवारी (दि. 3) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते 61 वर्षांचे होते.
संघ परिवार परिवाराशी नाळ जुळलेले संजय कोनकर शेवटपर्यंत भाजपशी एकनिष्ठ राहिले. ते रोह्याचे नगराध्यक्ष असताना त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. भाजपचे विचार सर्वसामान्य लोकांमध्ये पोहचण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. प्रत्येकाला मायेची पाखर देणारे अज्ञातशत्रू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सरचिटणीस मिलिंद पाटील, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख बाळा खटावकर, समीर सपकाळ, जितू दिवेकर, समीर शेंडगे, मयूर दिवेकर, नितीन तेंडुलकर, महेंद्र गुजर, विजय मोरे, विनोद पाशिलकर, आर. आर. बांरदेशकर, बेडेकर, राजेश डाके, महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, सरचिटणीस श्रद्धा घाग यांच्यासह संघ परिवारातील व्यक्तींनी संजय कोनकर यांचे अंत्यदर्शन
घेऊन श्रद्धांजली वाहिली.

संयमी, अभ्यासू, मार्गदर्शक असलेले नेते संजय कोनकर हरपल्याने भाजपची मोठी हानी झाली आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्न करणारा व पक्ष संघटनेसाठी अविरत मेहनत घेणारा एक निष्ठावंत नेत्यास आज भाजप परिवार मुकला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सर्व सहकारी कोनकर कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सोबत आहोत.
-आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply