Breaking News

रोह्यातील धोकादायक रस्त्याची पोलीस निरीक्षकांकडून पाहणी

रोहे : प्रतिनिधी

शहरातील मेहेंदळे वाड्याच्या जागी आता टोलेजंग टॉवर उभा राहिला आहे. त्याच्या समोरील रस्ता अरुंद झाल्याने धोकादायक झाला आहे. सोमवारी (दि. 21) राम मारुती चौकात शिवजयंती निमित्ताने महाराजांना अभिवादन केल्यानंतर पोलीस निरिक्षक संजय पाटील यांनी काकासाहेब गांगल मार्ग व भाटे वाचनालयाकडे जाणार्‍या रस्त्यांची पाहणी करत येणार्‍या अडचणी जाणून घेतल्या.

मेहेंदळे वाडा या ठिकाणी विकासकाने टोलेजंग टॉवर उभारला आहे. त्यामुळे येथील रस्ता वाहनचालक व पादचार्‍यांना धोकादायक ठरत आहे. याबाबत भाजप नेते संजय कोनकर यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करत मुख्याधिकार्‍यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर न.प.प्रशासनाकडून आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करण्याची विनंती कोनकर यांनी पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक पाटील सोमवारी या रस्त्याची पाहणी केली असून यासंबंधी मुख्याधिकार्‍यांजवळ चर्चा करून  उपाययोजना करण्यास सांगतो, असे आश्वासन संजय पाटील यांनी दिले आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply