Breaking News

मुरूड येथे पिकअप टेम्पो पलटी; 21 जण जखमी

मुरुड : प्रतिनिधी

तालुक्यातील केळकर येथे किक्रेट मॅच खेळून महालोर गावातील मुले शनिवारी (दि. 11) रात्री 8 वाजता पिकअप  टेम्पो (एमएच 06, बीजी 2145)तून घरी परत येत होती. काही अंतर गेल्यानंतर एका चढावावरील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पलटी होऊन 21 जण जखमी झाले. त्यातील सहा जण गंभीर जखमी आहे. अपघातानंतर टेम्पो चालक इत्किप इकबाल दळवी पळून गेला. 

या अपघाताचे वृत्त समजताच महालोरचे सरपंच हरी भाकरे व  ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मुरूड ग्रामीण  रूग्णालयात दाखल केले. या अपघातात काशीनाथ देवजी शिगवण, चंद्रकांत हरी पाटील, गोपाळ पांडुरंग लोढे, गणेश रामा शिगवण, निखील हरिश्चंद्र पाटील, अनिकेत गणपत अदावडे हे सहाजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारकरिता अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात  हलविण्यात आले आहे. तर ऋषिकेश सिताराम शिगवण, अनिकेत सुरेश पाटील, नागेश चंद्रकात पाटील, विठ्ठल हरिश्चंद्र धनावडे, अनिकेत रामचंद्र पानगळे, प्रदिप दगडू अदावडे, साईनाथ लक्ष्मण डिके, श्रेयस राजेश धनावडे, रोहन नरेश भुवड, दिपक सुरेश मोहिते, शशिकांत सखाराम धनावडे, विराज विठ्ठल धनावडे, सुदेश सुरेश अदावडे, प्रविण दगडू नलावडे  या जखमींवर  मुरूड ग्रामीण रुग्णालय उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी चालक  इत्किप इकबाल दळवी यांच्यावर मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार विश्वनाथ पाटील करीत आहेत.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply