Breaking News

कमळ पतसंस्थेचे काम वाखाणण्यासारखे

आमदार प्रशांत ठाकूर यांचे गौरवोद्गार

कर्जत ः प्रतिनिधी

जिल्ह्यात अनेक सहकारी बँका व पतसंस्था आहेत. काही सहकारी बँका व पतसंस्था घोटाळ्यांमुळे बंद पडल्या, परंतु कमळ नागरी पतसंस्थेचे काम अत्यंत प्रामाणिकपणे चालते. त्यामुळे ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. या पतसंस्थेचे काम वाखाणण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 8) येथे केले. कमळ नागरी पतसंस्थेच्या नेरळ येथील 14व्या शाखेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास पतसंस्थेचे उपमहाव्यवस्थापक रंजन पाटील, नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा पारधी, कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले, उपसरपंच मंगेश म्हसकर, पंचायत समितीचे माजी सदस्य नरेश मसणे, भाजप जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, संजय कराळे, शाखा व्यवस्थापक गणेश हजारे, देवेंद्र कारूळकर, उमेश पाटील, प्रमोद राऊळ आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या युगातही कमळ नागरी पतसंस्थेची आज नेरळमध्ये ही चौदावी शाखा सुरू होत आहे. हे या पतसंस्थेचे यश आहे. सरकारी बँकांना विमा संरक्षण आहे. त्याचप्रमाणे चांगले काम करणार्‍या पतसंस्थांनासुद्धा विमा संरक्षण मिळाल्यास त्यांचा व्यवसाय अधिक होईल, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. भाजप कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांनी उपस्थितांचे स्वागत, तर सूत्रसंचालन संचालक संतोष पुरो यांनी केले. पतसंस्थेचे संचालक, ग्राहक व नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply