Breaking News

हायकल कंपनीतील कामगारांची दिवाळी गोड

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पगारवाढ करार

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जय भारतीय जनरल कामगर संघटनेच्या माध्यमातून हायकल लिमिटेड कंपनीतील कामगारांना 16 हजार 200 रुपयांच्या भरघोस पगारवाढ तसेच विविध सुविधा देणारा करार गुरुवारी (दि. 6) भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत खांदा कॉलनीतील कामगार  आयुक्तालयात झाला.

जय भारतीय जनरल कामगार संघटना आणि हायकल लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार कामगारांना चार वर्षांसाठी 16 हजार 200 रुपये, रिटायमेंटनंतर दोन वर्षांसाठी मेडीकल पॉलिसी, दोन लाख रुपयांपर्यंत बीनव्याजी कर्ज, सहलीसाठी सात हजार 500, दोन लाख 50 हजार तसेच जास्त खर्चासाठी पॉलिसी तसेच फेस्टीवल अ‍ॅडव्हान्स म्हणून 20 हजार रुपये मिळणार आहे. हा करार खांदा कॉलनीमधील कामगार आयुक्तालयात हायकल कंपनी पदाधिकारी आणि जय भारतीय जनरल कामगार संघटनेमध्ये झाला. या वेळी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, कार्याध्यक्ष समिता चव्हाण, प्रदीप पवार, सहाय्यक कामगार आयुक्त समीर चव्हाण, कंपनीचे एचआर हेड संचित सिन्हा, विशाल पाटील, डेप्युटी मॅनेजर देवेंद्र पालेकर, युनिट सेक्रेटरी नारायण पाटील अध्यक्ष प्रशांत कदम, राजेश साळवी, सतीश घरत, नथुराम म्हात्रे, हरिश भोईर, योगेश भोगले, संतोष शिर्के, जीन कार्डोझा आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply