उरण ः संत्र्यांच्या आडून 1476 कोटींच्या अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकरण ताजे असतानाच आता नाशपाती, हिरव्या सफरचंदांच्या नावाखाली दक्षिण आफ्रिकेतून आयात करण्यात आलेल्या एका कंटेनरमध्ये 500 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याआधी या महिन्याच्या सुरुवातीलाच संत्र्यांच्या एका खेपेतून 198 किलो मेथ आणि नऊ किलो कोकेन असा 1476 कोटी किमतीचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी व गुप्त खबर्याकडून मुंबईच्या डीआयआय विभागाच्या अधिकार्यांना मिळालेल्या माहितीनुसार जेएनपीए बंदरातून दक्षिण आफ्रिकेतून आयात होत असलेल्या नाशपाती आणि हिरवी सफरचंद घेऊन जाणारा कंटेनर अडवला असता कोकेनच्या विटा लपविल्याचे निदर्शनास आले. हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …