Breaking News

भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियन सहसचिवपदी राहुल जाधव यांची नियुक्ती

खालापूर, खोपोली ः प्रतिनिधी – भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाश जाटव यांच्या संमतीने भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियन महाराष्ट्र प्रदेश सहसचिवपदी भाजपचे युवा नेते राहुल सखाराम जाधव यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू चौहान यांनी शुक्रवारी (दि. 15) पत्राद्वारे जाहीर केली.

राहुल जाधव यांनी भाजपचे उमेदवार म्हणून खोपोली नगर परिषद 2016ची निवडणूक त्यांचे वडील हट्ट्रिक किंग खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कै. सखाराम जाधव यांच्या पारंपरिक प्रभाग क्रमांक एकमधून लढवली होती. त्यांच्या या ऐनवेळेच्या उमेदवारीने त्यांनी तगडे आव्हान निर्माण केले होते. युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख, सोशल मीडियात सक्रिय असणारे राहुल जाधव यांनी भाजप सोशल मीडिया रायगड जिल्हा सहसंयोजक तसेच कर्जत विधानसभा संयोजक (अध्यक्ष) अशा विविध जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत.

राहुल जाधव फाऊंडेशन (रजि.) या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात ते काम करीत आहेत. संघटनेचे नियम व वैचारिकतेचे पालन करून संघटना मजबूत करण्याचे कार्य आपण कराल. कामगार व नियुक्तीचे मध्य समन्वय बनवण्याचे कार्य आपण कौशल्यपूर्णरीत्या कराल, अशा शुभेच्छा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू चौहान यांनी दिल्या आहेत. सर्व लोकांशी चांगला संपर्क असणार्‍या राहुल जाधव यांच्या नियुक्तीबद्दल भाजप व त्यांच्या

मित्रपरिवाराकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply