Breaking News

पनवेल महानगरपालिकेच्या 1,043 विविध पदांना शासनाची मान्यता

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिकेला राज्य शासनाने आवश्यक असलेल्या 1,043 पदांच्या सेवा प्रवेश नियमास मान्यता दिली आहे. सेवा प्रवेश व सेवा वर्गीकरणाच्या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी प्राप्त करून आणल्याबद्दल, महापालिका मुख्यालयात मंगळवारी (दि. 11) महापालिकेतील सर्व विभाग प्रमुखांनी आयुक्तांचे तसेच उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त सुवर्णा देखणे तसेच आस्थापना विभाग प्रमुख नामदेव पिचड यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. या मंजुरीमुळे महापालिकेमधील अनेक कर्मचार्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पनवेल महानगरपालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016मध्ये झाल्यानंतर महापालिकेच्या आस्थापना विभागाने सेवा प्रवेश नियम तयार केले होते. त्यास महासभेत मंजुरीही मिळाली होती. या सेवा नियम शासन मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विठ्ठल डाके आणि सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, आस्थापना विभाग प्रमुख नामदेव पिचड यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर अखेर शासनाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार प्रशासकीय व तांत्रिक पदांच्या सेवा प्रवेश नियमास मान्यता मिळाली आहे. या प्रस्तावामध्ये प्रशसकीय सेवा, लेखा सेवा, लेखा परिक्षण सेवा, तांत्रिक सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, अग्निशमन संवर्ग आणि सेवा या अंतर्गत येणार्‍या अधिकारी गट ‘अ’, गट ‘ब’ आणि कर्मचारी गट ‘क’आणि गट ‘ड’यांमध्ये येणार्‍या 1,043 मंजूर पदांपैकी रिक्त पदांची बिंदूनामावलीनुसार भरती करण्यात येणार आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध कर्मचारी कमी आहेत. राज्य शासनाने आवश्यक असलेल्या पदांना मान्यता दिल्याने जुन्या कर्मचार्‍यांचा आता महापालिकेत समावेश करता येईल. सेवा प्रवेश नियमास मान्यता मिळाल्याबद्दल मी प्रशासनाचे अभिनंदन करतो.

-परेश ठाकूर, माजी सभागृह नेते

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply