Breaking News

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीसदस्यांचे श्रमदान ; स्वच्छता अभियानात सुधागडात 2336 श्रीसदस्यांचा सहभाग

पाली : रामप्रहर वृत्त

स्वच्छतादूत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणाच्या वतीने रविवारी सुधागड तालुक्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सकाळी 7 वाजल्यापासून श्रीसदस्यांनी झाडू, घमेल, कोयते, फावडे, पंजा आदी साहित्य घेऊन पाली शहर स्वच्छ केले. त्यामध्ये तहसील कार्याकाय, पोलीस ठाणे, दिवाणी न्यायालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, श्री बल्लाळेश्वर देवस्थान, पंचायत समिती, भूमिअभिलेख, बसस्थानक, विज वितरण कंपनी, वनविभाग कार्यालय, कृषीविभाग कार्यालय, पाली ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद गेस्ट हाउस, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, हटालेश्वर मंदिर, राम मंदिर, छत्रपती शिवाजी चौक आदी शहरातील 22 कार्यालयाच्या परिसर स्वच्छ केले. तसेच 18कि.मीचे सात रस्ते, गटारेही स्वच्छ केली.

यावेळी या स्वच्छता मोहिमेसाठी 2336 सदस्यांनी सहभाग घेऊन शहरातील 40 टन कचरा जमा केला. ट्रक्टर, टेंपो अशा 28वाहनांच्या सहाय्याने तो कचरा उचलून डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्यात आली.

…………………………………………………………………………………..

खालापुरात शासकिय कार्यालय परिसरात स्वच्छता

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर येथील शासकिय कार्यालय परिसरात श्रीसदस्यानी रविवारी स्वच्छता मोहीम राबवली. सकाळी सात वाजता खालापूर येथे श्रीसदस्यांनी स्वच्छता मोहीम सुरु केली. खालापूर तहसिल कार्यालय, पोलीस ठाणे, न्यायालय, पंचायत समिती, उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय, कारागृह, वनविभाग परिसर तसेच भूमापन कार्यालय परिसर श्रीसदस्यांनी स्वच्छ केला.

पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वनविभाग कर्मचारी, नगरसेविका कांचन गव्हाणकर, नगरसेवक उमेश गावंङ तसेच नगरपंचायत सफाई कामगार यांनीदेखील या स्वच्छते मोहिमेत सहभाग घेतला. तीन तास चाललेल्या या मोहिमेत शासकिय कार्यालय परिसराचे रूपच पालटून गेले. श्रीसदस्यानी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे खालापूर पोलीस निरिक्षक विश्वजीत काईंगङे यांनी कौतुक केले.

…………………………………………………………………………………..

नेरळमध्ये स्वच्छता मोहीम

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रविवारी सार्वजनिक रस्त्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. नेरळ ग्रामपंचायत कार्यालयापासून गावातील रस्त्यांची स्वच्छता मोहीम सुरू झाली. उपसरपंच अंकुश शेळके आणि केतन पोतदार यांनी श्रीफळ वाढवून आणि हातात झाडू घेऊन या मोहिमेला सुरुवात केली.

नेरळ गावातील रेल्वे स्टेशनपासून जकात नाका ते हुतात्मा चौक, जकात नाका ते दिव्या दीप हॉटेल ममदापुर नाका तसेच टॅक्सी स्टॅन्डपासून खांडा रस्ता यांची यावेळी श्री सदस्यांनी झाडू  मारून साफसफाई केली. त्याचवेळी कर्जत तालुक्यातील बाजारपेठ असलेल्या ठिकाणीदेखील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात कर्जत शहर, माथेरान, डिकसळ गाव, कशेळे, कडाव आणि कळंब येथेदेखील श्री सदस्यांनी रस्त्यांची स्वच्छता केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply