Breaking News

तळोजातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा

पनवेल ः वार्ताहर

फुटलेल्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने तळोजा सेक्टर 11मधील काही सोसायटीधारकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. ऐन दिवाळीतच हा प्रकार घडल्याने रोष व्यक्त केला जात आहे. तळोजा सेक्टर 11मधील गणेश मंदिर, जय शक्ती, सुमोध सोसायटीलगत असलेल्या रस्त्यावरील मलनिःसारण वाहिन्या भरून रस्त्यावर वाहत आहेत. अशातच या परिसरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार रहिवाशांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली होती. या वेळी गणेश मंदिर रस्त्यावरील मलनिःसारण वाहिन्यांची पाहणी केली असता, जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी मिसळण्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे तळोजाकरांना दूषित पाणीपुरवठा झाला. याविषयी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे विचारणा केली असता, गळती लागलेली जलवाहिनी तत्काळ दुरूस्त केल्याची माहिती देण्यात आली.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply