पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील शेडुंग येथील जय मल्हार सोसायटीच्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 30) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी बिल्डर गजानन खबाळे, माजी सरपंच व कामगार सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुभाष जेठू पाटील, युवा नेते योगेश लहाने, सदस्य मोहन दुर्गे, रामदास खेत्री, शांताराम दुर्गे, ज्ञानेश्वर पाटील, सुनील पाटील, रवी दुर्गे, गजानन दुर्गे, जय मल्हार सोसायटीचे रहिवासी नरेंद्र देसाई, अमोल मगर, तानाजी सावंत, संतोष गायकवाड, श्रीरंग बेलकर, विकास पाटील, कृष्णराव जगदाळे, किरण नाईकवाडे, आशिष धनवडे, विनोद शिंदे, नामदेव साळवी, अरुण देसाई, लक्ष्मण झोरे, महेश केदारे, संदीप पाटील, संतोष पाटील, विकी गवाणे तसेच शेडुंग गावचे विशाल पाटील, सुधाकर पाटील, प्रकाश खेत्री, रामदास दुर्गे, आत्माराम लबडे, प्रतिक खेत्री, पांडुरंग दुर्गे, कृष्णा दुर्गे, पुंडलिक दुबे आदी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाषणात जुने, नवीन असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही तसेच सोसायटीच्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.