Breaking News

प्रकल्पग्रस्तांकडून बीपीसीएल कंपनीला गेटबंद आंदोलनाचा इशारा

उरण :  प्रतिनिधी

बीपीसीएल कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांनी न्याय मिळवून घेण्यासाठी 9 नोव्हेंबर रोजी बीपीसीएल कंपनीला गेटबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला उरण तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. उरण येथील बीपीसीएल प्रकल्पात सुमारे 150 प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील 30 वर्षांपासून अद्यापही नोकर्‍यांपासून वंचित आहेत. या प्रकल्पबाधीत शेतकर्‍यांचा नोकर्‍यांसाठी गेल्या 30 वर्षांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे, मात्र 30 वर्षांच्या संघर्षानंतरही प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाच्या प्रवेशव्दारावरच बेमुदत सुरू केले आहे. साखळी उपोषणानंतरही बीपीसीएल प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी 9 नोव्हेंबर रोजी गेटबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत 30 वर्षांपूर्वी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या प्रकल्पासाठी भेंडखळ, बोकडविरा, डोंगरी, फुंडे आदी गावातील सुमारे 300 शेतकर्‍यांच्या 207 एकर जमीन संपादित करण्यात आलेल्या आहेत. जमिनी संपादन करताना प्रकल्पग्रस्तांना वारेमाप आश्वासने देण्यात आली होती. यामध्ये प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍या देण्याच्या आश्वासनांचा समावेश आहे, मात्र आजतागायत 300 प्रकल्पग्रस्तांपैकी फक्त 170 लोकांनाच नोकर्‍या मिळाल्या आहेत. उर्वरित प्रकल्पबाधीतांनाही प्रकल्पात नोकर्‍या देण्याच्या मागणीसाठी मागील 30 वर्षांपासून बीपीसीएल विरोधात प्रकल्पग्रस्तांचा जोरदार संघर्ष सुरू आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply