Breaking News

अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची माणगावच्या निकम स्कूलला सदिच्छा भेट

माणगाव : प्रतिनिधी

विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी  नुकताच माणगाव येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कुल अँड ज्युनियर सायन्स कॉलेजला सदिच्छा भेट दिली. माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एम. एस. निकम यांनी पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले. शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, परंतु सुसंस्कृत नाही.आज मला सर्वात चांगली गोष्ट भावली ती म्हणजे आपण नर्सिंगचा डिप्लोमा सुरु केलेला आहे. माणुसकीचे धडे आपण देत आहात यातच आपली खरी श्रीमंती आहे, असे सांगून अ‍ॅड. उज्वल निकम यांनी शाळेचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव सुभाष मेथा, खजिनदार अमृत दोशी, स्कुल कमिटी चेअरमन अ‍ॅड. प्रकाश ओक, सदस्य अ‍ॅड.राहुल ओक, माणगाव व्यापारी संघाचे अध्यक्ष लक्ष्मण दळवी, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, रवी फार्मचे संचालक रामनारायण मिश्रा यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply