Breaking News

आपण भाजपचे कार्यकर्ते हे आपले सौभाग्य! -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत हे आपले सौभाग्य आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संकल्पसभेत केले.
मागील 11 वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आमुलाग्र बदल घडले आहेत. देशाने जगभरात नावलौकिक मिळवला असून देशाच्या अर्थव्यवस्थेने जगाच्या तुलनेत महत्त्वपूर्ण झेप घेतली आहे. मागील 11 वर्षांतील याच सर्व कामांची माहिती नागरिकांना देण्यासाठी विकसित भारत संकल्प सभेचे आयोजन नवीन पनवेल मधील कर्नाटक हॉलमध्ये रविवारी (दि.22) करण्यात
आले होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोदी सरकारने 2014 पासून राबवलेल्या सर्व योजना तसेच प्रमुख कामगिरींबद्दल माहिती देत मार्गदर्शन केले. तसेच भाजपचे प्रवक्ते यांनी मार्गदर्शन करत भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध समाजकल्याणकारी योजना राबवून सर्वसामान्य जनतेचा विचार केला असल्याचे प्रतिपादन केले.
या सभेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर सिताताई पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरद म्हात्रे, भाजपचे प्रवक्ते महादेव गांगुर्डे, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, एकनाथ गायकवाड, अ‍ॅड. मनोज भुजबळ, समीर ठाकूर, माजी नगरसेविका राजेश्री वावेकर, सुशिला घरत, वृषाली वाघमारे, माजी नगराध्यक्ष संदिप पाटील, गणेश पाटील, भिमराव पवार, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, किशोर चौतमोल, जगदीश घरत, प्रभाग 15 अध्यक्ष शांताराम महाडीक, प्रभाग 16 अध्यक्ष शिवाजी भगत, प्रभाग 17 अध्यक्ष विजय म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
या सभेत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंत्तीनिमीत्त भारतीय जनता युवा मोर्चा, नवीन पनवेल यांच्या आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत पाचवी ते सातवी या गटामध्ये प्रथम क्रमांक वेद बागवे, द्वितीय क्रमांक स्वराज काटकर आणि तृतीय क्रमांक जानवी राठोर यांनी पटकावला तर आठवी ते दहावी या गटात पहिला क्रमांक योगेश पाटील, दुसरा क्रमांक स्वरूप ठाकूर आणि तिसरा क्रमांक मुग्धा वाघमारे यांनी पटकावला. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि बक्षिस देऊन गौरवण्यात आले.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply