Breaking News

रायगड प्रीमियर लीगचा शिरढोणमध्ये थरार

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील मैदानात बहुचर्चित रायगड प्रीमियर लीगच्या तिसर्‍या हंगामाला शुक्रवार (दि. 4)पासून प्रारंभ झाला आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. टेनिस क्रिकेटची उंची वाढवण्यासाठी शिरढोणकरांचे महत्त्वाचे योगदान आहे, असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश गायकवाड, रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष महेश म्हात्रे, माजी जि. प. सदस्य जितेंद्र घरत, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू पाटील, माजी उपसरपंच विद्याधर जोशी, बाळूशेठ पाटील, कमलाकर टाकळे, छोटू जुमलेदार, शिरढोणच्या सरपंच साधना कातकरी, उपसरपंच रेश्मा वाजेकर, माजी उपसरपंच व सदस्य गजानन घरत, प्रमोद कर्णेकर, विजय भोपी, भाऊ वाजेकर, मुंबई क्रिकेट असोसिशनचे अध्यक्ष अमोल म्हात्रे, ठाणे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मेघनाथ गोंधळे, काटईचे आयोजक अनंता पाटील, अंजूरचे उपसरपंच केतन तरे, सुनील घरत,  शिरढोणच्या अचानक मित्र मंडळ कोअर कमिटीचे अध्यक्ष प्रितेश मुकादम, माजी उपसरपंच गजानन पाटील (दापोली) आदी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यात आमदार आपल्या दारी!

उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत व्यक्त केले समाधान पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे वसाहतीत आमदार प्रशांत ठाकूर …

Leave a Reply