नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत शनिवारी (दि. 23) कोरोनाचे 74 रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या एक हजार 561 झाली आहे.तर दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 51 झाली आहे. गेले दोन दिवस बरे होणार्यांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंतेत असलेल्या नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
आजतागायत 9 हजार 943 नागरिकांची कोरोना टेस्ट झाली असून एकूण 7311 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर अद्यापही एक हजार 71 अहवाल प्रलंबित आहेत. शनिवारी पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह अहवाल येऊन एकूण 722 व्यक्ती बर्या झाल्या आहेत. घरी क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींची संख्या आठ हजार 909 असून, क्वारंटाइन कालावधी पूर्ण केलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 16 हजार 167 झाली आहे. शनिवारी बाधित झालेल्या रुग्णांत बेलापूर 6, नेरुळ 9, वाशी 7, तुर्भे 24, कोपरखैरणे 8, घणसोली 13, ऐरोली 7 विभागवार रुग्णांचा समावेश आहे.