Breaking News

सभापती संजय भोपी यांनी पदभार स्वीकारला ; महापौरांसह नगरसेवकांची उपस्थिती

कळंबोली : प्रतिनिधी

संजय भोपी यांनी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती(ब)च्या सभापतिपदाचा पदभार सोमवारी स्वीकारला. कळंबोली येथील प्रभाग समितीच्या कार्यालयात महापौर डॉ. कविता चौतमाल यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळते सभापती एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते भोपी यांनी पदग्रहण केले. या वेळी ज्येष्ठ नगरसेविका सीताताई सदानंद पाटील, विद्याताई गायकवाड, राजेश्री  वावेकर, नगरसेवक समीर ठाकूर, महादेव मधे, विजय खानावकर, कामगार नेते मोतीराम कोळी, पनवेल भाजप उपाध्यक्ष भीमराव पोवार, प्रभाग 15चे अध्यक्ष शांताराम महाडिक, माथाडी नेते राजेंद्र बनकर, देविदास खेडकर, नितीन काळे, रामदास महानवर, चेतन जाधव, अभिषेक भोपी, रोहन व्हटकर,  नवनाथ मेंगडे, नीलेश घाडगे, शशी इंगळे, शंकर वगरे, शरद मिशाल, भगवान विचारे, दत्ता कुलकर्णी, साळवी काका यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रभाग समितीत दोन सिडको वसाहती, कळंबोली, खिडुकपाडा, रोडपाली, वळवली, टेंभोडे, आसुडगाव ही गावे येतात. त्याशिवाय काही आदिवासी वाड्यांचाही समावेश आहे. या ठिकाणच्या पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे संजय भोपी यांनी सांगितले. याशिवाय सिडको वसाहतीत जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याबाबत एक आराखडा तयार करून त्याबाबत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस पाठपुरावा करण्यात येईल. कालबद्ध नियोजन करून सर्व समस्यांचे निराकरण करण्यास सभापती या नात्याने आपण कटिबद्ध असल्याचेही भोपी म्हणाले. याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर सभापतिपदाकरिता संधी दिल्याबद्दल त्यांनी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply