Breaking News

अटल करंडकमध्ये नाट्यकर्मी किशोर जोशींच्या नावे पारितोषिक

आमदार प्रशांत ठाकूर यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्त

अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये यावर्षापासून नाट्यकर्मी किशोर जोशी यांच्या नावे पारितोषिक मिळणार असल्याची घोषणा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. ज्येष्ठ नाट्यकर्मी किशोर गजानन जोशी यांच्या तैलिचित्राचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी अनावरण झाले. या वेळी ते बोलत होते.पनवेल येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी किशोर गजानन जोशी यांचे तैलचित्र ज्येष्ठ नेते चंद्रशेखर सोमण यांनी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासाठी दिले आहे. या तैलचित्राचे अनावरण भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख उपस्थितीत आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या वेळी माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अ‍ॅडव्होकेट मनोज भुजबळ, भाजप सांस्कृतिक सेलचे शहर मंडल संयोजक अभिषेक पटवर्धन,  कल्पना कोठारी,  कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, चंद्रशेखर सोमण, किशोर जोशी, प्रथमेश सोमण, बबन मुकादम, नाट्यकर्मी किशोर गजानन जोशी यांचे सुपुत्र चेतन जोशी, शोभा जोशी, श्रीधर साळवी, स्नेहा सुमन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तैलचित्राचे अनावरण सोहळ्यात आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, दरवर्षी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करतो तर त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट वेशभूषा यासाठीचा पारितोषिक नाट्यकर्मी किशोर गजानन जोशी यांच्या नावाने दिली पाहिजे त्याच्या अंमलबजावणीला या वर्षा पासूनसुरुवात करू असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगीतले.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply