Breaking News

कुंडलिका नदीत बुडून पर्यटकाचा मृत्यू

माणगावमधील घटना; दोघांना वाचविण्यात यश

माणगाव : प्रतिनिधी
पर्यटनासाठी माणगाव तालुक्यात आलेल्या ग्रुपमधील एका तरुणाचा कुंडलिका नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 3) घडली, तर त्याच्या दोन सहकार्‍यांना वाचविण्यात यश आले आहे.
मुंबई-ठाणे येथून 17 पर्यटक रविवारी वर्षासहलीसाठी माणगाव तालुक्यात आले होते. भिरा येथील देवकुंड परिसर पाहून झाल्यानंतर परतताना यातील दिनेश तुकाराम शिंदे (वय 24. रा. पिंपरी गाव, दहिसर मोरी, ठाणे), संदीप तांबेकर व हर्षद मेंदे हे तिघे म्हसेवाडी गावाजवळील कुंडलिका नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. या वेळी संदीप तांबेकर व हर्षद मेंदे यांना वाचविण्यात त्यांच्या उर्वरित सहकार्‍यांना यश आले, मात्र दिनेश शिंदे या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद करण्याचे काम माणगाव पोलीस ठाण्यात सुरू होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply