पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील तळोजामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयश्री पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 9) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी येथे देशाच्या कानाकोपर्यातून नागरिक राहायला आले असून वाढत्या लोकसंख्येत सर्वांच्या अडचणींना दिशा देण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास भाजप पनवेल पूर्व मंडळाचे अध्यक्ष दिनेश खानावकर, निर्दोष केणी, शक्ती केंद्रप्रमुख संतोष पाटील, भाजपचे प्रभाग क्रमांक 1चे अध्यक्ष दीपक पाटील, गोपीनाथ पाटील, सुनील पाटील, सरस्वती पाटील, माजी नगरसेवक संतोष भोईर, सुरेश पोरजी, नंदूशेठ म्हात्रे, नंदूशेठ भोपी, विजय पवार, बाळाराम पाटील, मदन पाटील दिनकर पाटील, कैलास धावणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा परिसरात नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जावेत आणि त्यावर योग्य तो तोडगा मिळावा या उद्देशाने हे कार्यालय कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. शासकीय, कोर्टकचेरी किंवा स्थानिक पातळीवरील कोणत्याही समस्यांवर मार्गदर्शन आणि सहाय्य करण्यासाठी हे कार्यालय नागरिकांचे हक्काचे केंद्र ठरेल. तळोजासारख्या जलदगतीने वाढणार्या भागात अशा जनसंपर्क कार्यालयाची आवश्यकता होती, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयश्री पाटील यांनी केले. तळोजा फेज 2 मधील मंगला रेसिडेन्सी येथे झालेल्या या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
या वेळी तळोजा फेज 2मधील नवनियुक्त सेक्टर अध्यक्ष तसेच प्रभाग 1 कमिटीतील नव्या पदाधिकार्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यानुसार प्रभाग 1 कमिटीच्या अध्यक्ष दीपक पाटील, सरचिटणीस जितेंद्र पोरजी, बाळाराम पाटील, उपाध्यक्ष अरुण पाटील, संतोष महद्वी, भास्कर तरे, चिटणीस सचिन कोपरकर, संजय म्हात्रे, निहाल ठाकूर, समीर पाटील व कोषाध्यक्षपदी सतीश कदम यांची, तर तळोजा फेज 2मधील सेक्टर 23चे अध्यक्ष जयसिंग गुंजाळ, से. 37 अध्यक्ष अनिकेत पाटील, से. 27 अध्यक्ष सुमित गवांदे, से. 20 अध्यक्ष प्रशांत काळे, से. 29 अध्यक्ष नवनाथ भोजने, से. 24 अध्यक्ष रतीश शेठी, से. 26 अध्यक्ष अजय भाऊगुडे, से. 8च्या अध्यक्ष डॉ. सतीश भोईर आणि से. 23चे अध्यक्ष हरप्रीत सिंग चड्डा यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. दरम्यान, तळोजातील सामाजिक कार्यकत्या माही मानकामे यांनी या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.
Check Also
कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा -मंत्री ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये कृतज्ञता मेळावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार पनवेल : …
RamPrahar – The Panvel Daily Paper