Breaking News

खांदा कॉलनीत आधार कार्ड, आभा कार्ड शिबिराला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि. 6) खांदा कॉलनीवासीयांसाठी आधार कार्ड तसेच केंद्र सरकारचे आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये खांदा कॉलनीतील असंख्य गरीब गरजू व्यक्तीनी या शिबिराचा लाभ घेतला.
भाजप पुरस्कृत श्री ओंकारेश्वर सामाजिक व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष व भाजप खांदा कॉलनी सरचिटणीस भीमराव पोवार यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली.
या वेळी माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, कामगार नेते मोतीलाल कोळी, जीवनसागर असोसिएशनचे सचिव विवेक बाजी, सचिन गायकवाड, भाजपचे गोपीनाथ मुंडे, मागासवर्गीय सेल खांदा कॉलनी अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, बुथ अध्यक्ष राजू महापूरकर, सुहास पाटील, सावंतसाहेब, चंद्रकांत चौधरी, श्याम भालेराव, महिला मोर्चाच्या राजश्री पोवार आदी उपस्थित होते.
अध्यक्ष भीमराव पोवार हे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्याचबरोबर दहीहंडी, सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करतात. याशिवाय विविध नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचार्‍यांकरिता छत्रीवाटप असे विविध कार्यक्रम सतत खांदा कॉलनीतील जनतेकरिता आयोजित करीत असतात.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply