पनवेल : रायगड जिल्ह्यात 379 कोरोना रुग्णांची गुरुवारी (दि. 6) नोंद झाली असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 179, ग्रामीण 42) तालुक्यात 221, अलिबाग 28, खालापूर 26, रोहा 25, महाड 24, पेण 23, उरण 17, माणगाव नऊ, कर्जत पाच आणि सुधागड तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण खालापूर व पेण प्रत्येकी दोन आणि पनवेल व सुधागड तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 366 रुग्ण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 17,346 आणि मृतांची संख्या 471 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 13,692 जणांनी कोरोनावर मात केली असल्याने 3183 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….
काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …
RamPrahar – The Panvel Daily Paper