Breaking News

खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे राष्ट्रीय पुरस्काराबद्दल अभिनंदन

प्राचार्या राज अलोनी यांचा सत्कार

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला भारत सरकारच्या वतीने स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार 2021-22 बहुमान मिळाला आहे. याबद्दल भाजप खारघर-तळोजा मंडलच्या उपाध्यक्ष बीना गोगरी यांनी शाळेला भेट देऊन प्राचार्य राज अलोनी यांचा सत्कार करून  त्यांचे अभिनंदन केले. या राष्ट्रीय पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून एक लाख तीन हजार शाळांनी नामांकन केले होते. त्यामधून माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून रामशेठ ठाकूर स्कूलची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. राष्ट्रीय स्तरावर एकूण 606 शाळांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघरला भारत सरकार व युनिसेफ यांच्यातर्फे राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 जाहीर करण्यात आला आहे.  प्राचार्य अलोनी यांच्या सत्कारावेळी गोगरींसोबत अंजू पटेल, सुशीला शर्मा, समता मोदी, निर्मला यादव, प्राची देशपांडे आदी उपस्थित होत्या. या सर्वांनी शाळेचे कौतुक करून या यशासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचे शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनादेखील शुभेच्छा दिल्या.

खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार मिळणे आहे हा आम्हा सर्व खारघरवासीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे.

-बीना गोगरी, उपाध्यक्ष, भाजप खारघर-तळोजा मंडल

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply