Breaking News

भाजपतर्फे आदिवासी बांधवांची नृत्य स्पर्धा

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि जनजाती गौरव दिनानिमित्त वनवासी कल्याण आश्रम व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील वाकडी येथे आदिवासी बांधव नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट देत भगवान बिरसा मुंडा यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, भाजप पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, दुंदरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील, सरपंच अनुराधा वाघमारे, वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश पाटील, मालडुंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा चौधरी, आदिवासी समाजाच्या जिल्हाध्यक्षा ठमाताई पवार, नामदेव जमदाडे, राजेश भोईर, भगवान पाटील, शांताराम चौधरी, राजेश पाटील, संदीप शिंदे, नारायण भगत, सोमनाथ चौधरी, रामदास शेळके, विकास भगत, जोमा निरगुडा, उदय टिळक, सुदाम पवार, पदु वाघ, रूपेश भोईर, जनार्दन निरगुडा आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply