Breaking News

पनवेलमधील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी (दि. 17) झालेल्या सभेत शहरातील रस्त्यांच्या सिमेंट- काँक्रीटीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. प्रभाग समिती ‘ड’मधील वॉर्ड क्रमांक 17, 18, 19 येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे.

पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. या सभेस सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अजय बहिरा, मुकीद काझी, सीता पाटील, आरती नवघरे, वृषाली वाघमारे, मोनिका महानवर, प्रमिला पाटील, संतोषी तुपे उपस्थित होते.

या वेळी प्रभाग समिती ‘ड’ अंतर्गत वॉर्ड क्रमांक 19मधील व्ही. बी. फडके रस्ता (दोन कोटी 29 लाख आठ हजार रुपये), वॉर्ड क्रमांक 18मधील रत्नाकर खरे रोड ते सावरकर चौक ते अमरधाम स्मशानभूमी रस्ता (नऊ कोटी 39 लाख 26 हजार रुपये) आणि वॉर्ड क्रमांक 17मधील अंतिम भूखंड क्रमांक 395पासून सम्राट हॉटेल ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4पर्यंत रस्ता (चार कोटी 15 लाख 93 हजार रुपये) या रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शहरातील हे रस्ते लवकरच सिमेंट-काँक्रीटचे होणार आहेत.

याशिवाय महापालिका हद्दीतील बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी 31 मार्च 2018पर्यंत आलेल्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. श्वान निर्बिजीकरण करण्याचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला. त्यावर पुढील सभेत चर्चा करण्याचे या वेळी ठरले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply