पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील पळस्पे येथील एमएनआर स्कूल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉलमध्ये विजय आर्मी स्कूल चिखले शाळेतील मुलांच्या 17 वर्षाखालील संघाने विजेतेपद आणि 19 वर्षाखालील संघाने उपविजेते पटकाविले.
यशस्वी विद्यार्थ्यांना व्हॉलीबॉलचे मार्गदर्शन जितू पाटील, क्रीडा शिक्षक देविदास पाटील. आर. एस. पाटील. व एस. ए. शेख यांनी केले.
विजेत्या व उपविजेत्या संघातील विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शकांचे रुक्मिणीबाई प्रतिष्ठान संस्थेचे कार्याध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील व शाळेचे प्राचार्य एम. के. मराठे, कमांडर पीव्हीआर कृष्णन यांनी अभिनंदन केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनीही कौतुक केले.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper