Breaking News

रायगडच्या नैतिक, सिद्धार्थ यांची महाराष्ट्रच्या संभाव्य संघात निवड

अलिबाग : प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे निवडण्यात 16 व 25 वर्षांखालील  राज्याच्या संभाव्य संघात रायगड जिल्ह्यातील नैतिक सोळंकी आणि सिद्धार्थ या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या संघाचे शिबिर पुणे येथे सुरू आहे.
नैतिक व सिद्धार्थ यांची अनुक्रमे 16 व 25 वर्षांखालील महाराष्ट्र संभाव्य  संघ निवड  निवड करण्यात आली आहे, अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली. या दोन्ही खेळाडूंचे मते तसेच सर्व सदस्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
रायगडचा 15 वर्षांखालील मुलींचा संघ प्रथमच महिलांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. 20 नोव्हेंबरपासून ही स्पर्धा पुण्यात खेळली जाणार आहे. या संघाला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply