नगरसेवक विकास घरत यांचा पाठपुरावा
पनवेल ः वार्ताहर
पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमार्फत अनेक विकासकामे पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येत आहे. त्या अंतर्गत कार्यतत्पर नगरसेवक विकास घरत यांनी सिडकोकडे फूटपाथच्या समस्येसंदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या कामाचे रविवारी (दि. 1) भूमिपूजन झाले.कामोठे सेक्टर 17 आणि 36 येथील फूटपाथची दुर्दशा झाली असून नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर फूटपाथच्या समस्येसंदर्भात नगरसेवक विकास घरत यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी या केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून फूटपाथचे काम मार्गी लागले आहे. या भूमिपूजन समारंभास भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक विजय चिपळेकर, दिलीप पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. नगरसेवक विकास घरत यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रत्यक्ष कामाला शुभारंभ केल्याने स्थानिक रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.