Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला न्याय

बँकेकडून पैसे मिळाले परत

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळाला असून पंतप्रधान आवास योजनेचे पैसे पुन्हा मिळाले आहेत. त्यामुळे त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत.
पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथे सदाशिव झपाटे यांनी जानेवारी 2018मध्ये मुलाच्या नावावर वास्तुपूर्ती इमारतीत एक फ्लॅट विकत घेतला होता. त्यानंतर त्यांना नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत दोन लाख 67 हजार रुपये मिळाले.
त्यांनी हा फ्लॅट विकत घेण्यासाठी इंडिया बुल्स या बँकेतून लोन घेतले होते, मात्र व्याज दर जास्त असल्याने त्यांनी बँकेत जाऊन आपले लोन दुसर्‍या बँकेत ट्रान्सफर करण्यास सांगितले, मात्र त्यांचे पंतप्रधान आवास योजनेचे पैसे परत मिळणार नाहीत, असे त्या वेळी त्यांना बँकेमार्फत सांगण्यात आले.
आपले हक्काचे पैसे पुन्हा मिळणार नसल्याचे समजताच सदाशिव झपाटे यांनी या संदर्भात बँकेच्या वरिष्ठांकडे तक्रार केली तसेच पत्रव्यवहार केला. अनेक वेळा बँकेच्या खेटाही मारल्या. तरीही त्यांना न्याय मिळत नव्हता. या संदर्भात त्यांनी हरिग्राम येथील भाजपच्या पदाधिकार्‍यांमार्फत आपली समस्या पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमोर मांडली. आमदारांनी त्वरित याची दखल घेत संबंधितांना फोन करून त्यांना सूचना दिल्या. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांच्या आत सदाशिव झपाटे यांचे पैसे मिळाले असून त्यांचे लोनही दुसर्‍या बँकेत ट्रान्सफर झाले. त्याबद्दल झपाटे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
या वेळी हरिग्रामचे पोलीस पाटील सदानंद म्हात्रे, माजी उपसरपंच विश्वास म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास म्हात्रे उपस्थित होते. या संदर्भात सदाशिव झपाटे यांनी अधिक माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी व आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply