माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा दावा
पेण : प्रतिनिधी
विधानसभेच्या पेण मतदारसंघात गेल्या 10 वर्षांत शेतकरी कामगार पक्षाच्या आमदाराने कोणताही विकास केलेला नाही. त्या पक्षातील कार्यकर्त्यांसह मतदारांचा भाजपकडे ओघ सुरू झाला असून, कळवे ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्याला प्रेमाची भेट दिली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी सोमवारी (दि. 30) येथे केले.
पेण विधानसभा मतदारसंघातील कळवे ग्रामपंचायत सदस्य साक्षी पाटील, संगीता म्हात्रे, प्रज्ञा पाटील, शंकर पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी भाजपत प्रवेश केला. माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात रविशेठ पाटील बोलत होते. आता या मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
कळवे येथील सूर्यास पाटील, गोरख काथुरी पाटील, भाऊराव हसू पाटील, विनायक कमळ पाटील, हिरामण राजाराम पाटील, गंगाधर पाटील, सतीश पाटील, गणेश पाटील, गजानन पाटील, चंद्रहास पाटील, चंद्रकांत पाटील, बाबूराव मोकल, बाबूराव म्हात्रे, लक्ष्मण म्हात्रे, नरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी ग्रामपंचायत सदस्या साक्षी पाटील, संगीता म्हात्रे, प्रज्ञा पाटील, शंकर पाटील तसेच किरण पाटील, सागर पाटील, विशवनाथ मोकल, सुजीत पाटील, शिवहरी पाटील, पुंडलिक पाटील, शंकर पाटील, लता पाटील, रामचंद्र पाटील, सुरेश पाटील, मारुती पाटील, शकुंतला म्हात्रे, सुविधा पाटील, मनीषा पाटील, विमल पाटील, सुधीर पाटील, जयश्री म्हात्रे, रजनी म्हात्रे, लता पाटील, विनय पाटील, श्रीधर म्हात्रे, दीनानाथ पाटील, फुलचंद पाटील आदी ग्रामस्थांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजप पेण तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, मारुती देवरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य कौसल्या पाटील, माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कळवे ग्रामस्थांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे या भागात माजी मंत्री रविशेठ पाटील यांची ताकद वाढली असून विरोधकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.