Breaking News

विदर्भात अतिवृष्टीचा इशारा; मोदींचा दौरा रद्द

नागपूर : प्रतिनिधी

नागपूर हवामान विभागाने विदर्भातील अनेक ठिकाणी पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी (दि. 7) अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने उद्या होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. याबरोबरच नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागपूरसह अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा आणि चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याबरोबरच अकोला, गडचिरोली आणि गोंदिया, वाशीममधील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अमरावती, भंडारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply