Breaking News

राहुल गांधी यांच्याविरोधात युवा मोर्चा आक्रमक

रोह्यात जोडे मारो आंदोलन

धाटाव : प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकराबद्दल आक्षेपार्ह विधाने करणार्‍या काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा चांगलीच आक्रमक झाली आहे. दक्षिण रायगड युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 18) रोहा शहरातील राम मारुती चौकात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला काळे फासून व जोडे मारो आंदोलन करण्यात आले. सध्या महाराष्ट्रात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा चालू आहे. या यात्रेदरम्यान वाशिम येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह  विधाने केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी रोहा शहरात भाजप युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या वेळी राहुल गांधी हाय हाय, स्वातंत्र्यवीर सावरकरके सन्मान में भाजप मैदान मे, वंदे मातरम, भारत माता की जय, या पप्पूचे करायचे काय खाली डोके वरती पाय अशा घोषणा देण्यात आल्या. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल  केलेली आक्षेपार्ह विधाने मागे घेऊन माफी मागावी, अशी मागणी युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी केली. भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शकाखाली व प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल लोणीकर, उपाध्यक्ष निखिल चव्हाण यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या या आंदोलनात युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस नरेश कोकरे, भाजप धाटव विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, रायगड जिल्हा सोशल मीडिया संयोजक संनिल ईगावले,  प्रधानमंत्री जनकल्याण योजना रायगड जिल्हा सचिव हाजी कोठारी, संकेत मोरे, धर्मा कोकरे, विष्णू तिवारी, जयंता कोकरे यांच्यासह भाजप, व युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply