पाली : रामप्रहर वृत्त
सुधागड पालीतील स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाली असून या स्मशानभूमीत सरणासाठी लाकडे नाहीत. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना लाकडांसाठी वणवण करावी लागत आहे. काहीवेळा नागोठणे किंवा रोहा येथून लाकडे आणून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. पाली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाले, मात्र येथील नागरी समस्या ‘जैसे थे’ आहेत. येथील एका व्यक्तीचे निधन झाले. स्मशानभूमीच्या गोडाऊनमध्ये लाकडे उपलब्ध नसल्यामुळे मृताच्या नातेवाईकांना सरणासाठी नागोठणे, रोहे येथून लाकडे आणावी लागली. मात्र या गंभीर समस्येबाबत नगरपंचायत उपाययोजना करताना दिसत नाही.
पाली स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना लाकडांसाठी वणवण करावी लागते. नगरपंचायतीने सराणासाठी लवकरात लवकर लाकडे उपलब्ध करून द्यावीत.
-प्रकाश पालकर, सामाजिक कार्यकर्ते, पाली