पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 22) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त सकाळी 9 वाजता गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यक्रम, 10 वाजता पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात उपस्थिती, दुपारी 12.30 वाजता भानघर वृद्धाश्रमास भेट, 1 वाजता खेरणे येथे विकासकामांचे उद्घाटन, 1.30 वाजता खांदा गाव ट्राय सिटी बिल्डिंग ऑफिसचे उद्घाटन, 2.30 वाजता कुंडेवहाळ येथे विकासकामांचे उद्घाटन, सायंकाळी 6 वा. शेलघर जि. प. शाळा येथे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून कम्प्युटर लॅबचे उद्घाटन करण्यात येणार आहे.