पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाच्या वतीने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
गव्हाण विद्यालयाच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासामध्ये सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावणारे विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन यांचा वाढदिवस दरवर्षी विद्यालयाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सालाबादप्रमाणे यावर्षीही अरूणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयामध्ये त्यांना पुष्पगुच्छ, स्नेहवस्त्र प्रदान करून आणि केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी अरुणशेठ भगत यांनी विद्यालयाच्या वतीने आपले अभिष्टचिंतन केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शाळा, परिसरातील कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्याचप्रमाणे या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये चेअरमन म्हणून काम करण्याची मला संधी प्राप्त झाली याचे अप्रूप वाटते, असे प्रतिपादन करून समाजातील सर्व घटकांच्या कामांमध्ये सहकार्य करण्याची मला संधी प्राप्त झाली हे माझे मी भाग्य समजतो असा कृतज्ञ भाव त्यांनी या वेळी व्यक्त केला.
या वेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता ठाकूर व विश्वनाथ कोळी, ग्रामपंचायत उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ नेते वसंत पाटील, गव्हाण ग्रामपंचायतच्या सदस्य योगिता भगत, सुहास भगत, ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख, सुजाता पाटील, सुधीर ठाकूर, ज्येष्ठ नेते भाऊ भोईर, सदानंद देशमुख, राजेंद्र देशमुख, युवा नेते किशोर पाटील, शुभम पाटील विधिज्ञ रुपेश म्हात्रे तसेच विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा उपमुख्याध्यापक प्रमोद मंडले, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्यद्वय प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी यांनी केले तर सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार उपशिक्षक सागर रंधवे यांनी मानले.