Saturday , December 3 2022

स्पिरिट शिल्ड क्रिकेट स्पर्धेत उरण स्पोर्ट्स व भेंडखळचा संघ विजयी

उरण : बातमीदार
खोपोली येथील हाय डेफिनेशन स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित स्पिरिट शिल्ड 15 वर्षांखालील लेदर बॉल एकदिवसीय 45 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यांत उरण क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन व भेंडखळ क्रिकेट अकॅडमी संघांनी विजय मिळवला.
उरण क्रिकेट स्पोर्र्ट्स असोसिएशनने नवी मुंबई वाशी येथील अविनाश साळवी फाउंडेशन संघाचा 228 धावांनी पराभव करीत सामना जिंकला. उरण संघाकडून ओम म्हात्रे याने 107 चेंडूंचा सामना करीत सर्वाधिक 160 धावा ठोकल्या. त्याला सामानावीर म्हणून गौरविण्यात आले, तर शौर्य पाटील याने 65 धावा केल्या. अविनाश साळवी फौंडेशन संघाकडून अर्णव रामदासी याने 63 धावांची खेळी केली.
दुसर्‍या एका साखळी सामन्यात भेंडखळ क्रिकेट अकॅडमी संघाने रोह्या येथील दिशा क्रिकेट अकॅडमी संघाचा 235 धावांनी पराभव करीत सामना एकतर्फी जिंकला. भेंडखळ संघाचा गोलंदाज शिवांश तांडेल याने सर्वाधिक पाच गडी बाद केले, तर दक्ष पाटील यान 99, निर्जर पाटील 83, साम्य पाटील 73, जिग्नेश म्हात्रे नाबाद 54 धावा काढल्या. दिशा क्रिकेट अकॅडमीकडून अमित जोगडे यांनी 80 धावांची झुंज दिली. शिवांश तांडेल याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
स्पिरीट शिल्ड क्रिकेट स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला असून प्रत्येक संघाला तीन लिग मॅचेस खेण्यास मिळणार आहेत. प्रत्येक ग्रुपमधून दोन टॉप संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहेत. ही स्पर्धा एक महिना चालणार असून सर्व सामने 45 षटकांचे असणार आहेत त्यामुळे प्रत्येक संघातील 14 खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची पुरेपूर संधी मिळणार आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उमाशंकर सरकार, हृषीकेश कर्नुक, निकुंज विठलांनी, रोहित कार्ले परिश्रम घेत आहेत.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply