Breaking News

9500हून अधिक विद्यार्थ्यांनी चितारले स्वच्छ नवी मुंबईचे सुंदर चित्र

नवी मुंबई ः बातमीदार   

स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत 9500हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्वच्छ नवी मुंबईचे सुंदर चित्र रेखाटले. कोपरखैरणे येथील सेक्टर 14मधील निसर्गोद्यानामध्ये शाळानिहाय विद्यार्थी जमले होते. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कडुसकर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. माजी नगरसेवक शिवराम पाटील यांनीही स्पर्धास्थळी भेट दिली. चित्रकला स्पर्धेकरिता माझे शहर माझा सहभाग, प्लास्टिकमुक्त नवी मुंबई आणि 3आर हे विषय देण्यात आले होते. सर्वोत्कृष्ट तीन चित्रांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार असून 100  चित्रांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. चित्रकला स्पर्धेला मिळालेला उदंड प्रतिसाद हा उत्साह वाढविणारा असून अंगभूत चित्रकलेला उत्तेजन देणारा व शहर स्वच्छतेविषयी जबाबदारी व दायित्व प्रदर्शित करणारा असल्याचे मत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त करीत सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply