पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती कायम आहे. खानाव येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मडंळाच्या सभागृहात गुरुवारी (दि. 3) झाला. खानाव येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच बळीराम भोईर, आंबो पाटील, बाळाराम भोईर, हनुमान पाटील, दीपक भोईर, रमेश शिंदे, नामदेव कर्णूक, अरुण पाटील, प्रदीप पाटील, संतोष पाटील, मनोहर तातरे, राहुल भोईर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेशाच्या वेळी आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष के. के. म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.