Breaking News

रामधरणेश्वर डोंगरावर वणवा

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा वणवे लागायला सुरुवात झाली आहे. सोमवारी (दि. 28) दुपारच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर डोंगरावर लागलेल्या आगीत वनसंपदेची मोठी हानी झाली. स्थानिक ग्रामस्थ आणि वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणली. रामधरणेश्वर डोंगरावर आग लागल्याची माहिती मापगांवचे माजी उपसरपंच चंद्रकांत खोत यांनी मुनवली येथील पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना दिली. घाडी यांनी लागलीच ही माहिती वनकर्मचारी प्रभाकर भोईर यांना दिली. भोईर यांनी वेळ न दवडता आपले वनकर्मचारी नागेश काष्टे, मंगेश धोंगडे, सुमित पाटील, प्रसाद मानकुळे यांना सोबत घेऊन घटनास्थळी आग विझविण्यासाठी गेले, तोपर्यंत घाडी यांनी प्रतीक पाटील याला सोबत घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली होती. वनकर्मचारी येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करून वनसंपत्तीचे नुकसान तर केलेच शिवाय अर्ध्यापेक्षा जास्त जंगल बेचिराख होऊन हिरव्यागार जंगलात काळीकुट्ट चादर पसरली, याबद्दल पर्यावरणप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे, तसेच समाजकंटकांचा शोध घेऊन कठोर कारवाइची मागणी केली.

यापुढील काळात वनक्षेत्रात गस्त वाढवून वनविभागाने वनांचे अर्थातच राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करावे.

-सचिन घाडी, सामाजिक कार्यकर्ते, मुनवली, अलिबाग

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply