Breaking News

सासरे-जावयात घमासान; तेजप्रताप यांचे पक्षविरोधी धोरण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील चार टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे, मात्र देशातील अनेक भागातील लोकसभेची रणधुमाळी आता रंगात आली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत असताना आता बिहारमध्ये जावई आणि सासर्‍यातच जुंपल्याचे चित्र आहे. लालूप्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी आपले सासरे आणि राजदचे सारणचे उमेदवार चंद्रिका राय यांना मतदान करू नका, असे आवाहन केले आहे.

दुसरीकडे चंद्रिका यादव यांच्या प्रचारासाठी लालूप्रसाद यादव यांचे दुसरे चिरंजीव तेजस्वी यादव तीन दिवसांपासून सारणमध्ये ठाण मांडून बसले आहेत, मात्र तेजप्रताप यादव यांच्या भूमिकेमुळे मतदारांत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. राजदच्या परंपरागत मतदारसंघातून बाहेरच्या व्यक्तींना निवडून देऊ नका. येथील महान जनता बाहेरच्या व्यक्तीला कधीही मतदान करणार नाही. राजदच्या उमेदवाराला मत देऊ नये. येथील उमेदवार चंद्रिका राय हे रंगबदलू असून लालूप्रसाद यादव यांच्या मतदारसंघातून त्यांना निवडून देऊ नका. चंद्रिका राय येथील जनतेला फसवण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे या व्यक्तीला आपले मौल्यवान मत देऊ नये, असे तेजप्रताप यादव यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुलगी ऐश्वर्या व तेजप्रताप यांच्यातील मतभेदांचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, तसेच त्यांच्यातील संबंध सुधारतील, असेही चंद्रिका राय यांनी सांगितले होते, मात्र तेजप्रताप यांच्या भूमिकेमुळे राय-यादव कुटुंबातील वाद आणखीनच चिघळत चालल्याचे चित्र दिसत आहे. सारणमधून चंद्रिका राय यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही तेजप्रताप यादव यांनी विरोध केला होता.

Check Also

‘मनचली’ऽ 50

अच्छाजी… लीना चंदावरकरचा लाडिकपणा गोष्ट अशी आहे, लीनाची (लीना चंदावरकर) फार असलेली वडिलोपार्जित मालमत्ता तिच्या …

Leave a Reply