Breaking News

धोनीच्या भवितव्याबद्दल सौरव गांगुली म्हणतो…

कोलकाता : वृत्तसंस्था

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्य आणि त्याची निवृत्ती हे विषय सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा मुद्दा बनले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीनेही याबद्दल विधान केले आहे. धोनीबद्दल निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ असून, याबद्दल धोनी आणि निवड समिती सदस्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत. याबाबतीत कोणताही संभ्रम नसल्याचे गांगुली म्हणाला.

‘महेंद्रसिंह धोनीबद्दल सर्व समिती सदस्यांत एकवाक्यता आहे. धोनीसारख्या खेळाडूबद्दल निर्णय घेताना काही गोष्टी या बंद दाराआड ठरवाव्या लागतात. याबद्दल जाहीर निर्णय घेतला जाऊ शकत नाही, असे सौरव गांगुली याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मध्यंतरी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आगामी आयपीएलमध्ये धोनी कसा खेळ करतो यावर भारतीय संघात त्याचे भवितव्य ठरेल, असे म्हटले होते.

दरम्यान, धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय संघात निवड समितीने ऋषभ पंतला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली, मात्र पंत सतत अपयशी ठरत असल्यामुळे धोनीला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी मध्यंतरीच्या काळात होत होती. त्यातच सौरव गांगुलीने केलेल्या वक्तव्यामुळे धोनीच्या निवृत्तीबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply