Breaking News

खारघरमध्ये डम्पिंग ग्राऊंडची पाहणी

परेश ठाकूर यांच्याकडून समस्यांचा आढावा

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर सेक्टर 27 येथे पनवेल महापालिकेमार्फत डम्पिंग ग्राऊंड तयार केलेले आहे. या डम्पिंग ग्राउंडमधून वास येत असल्याने तिथल्या परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या डम्पिंग ग्राऊंडची पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला. या पाहणीवेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, भाजप प्रदेश सोशल मीडिया सेलच्या सदस्य चांदनी अवघडे, हरजीत गुलाटी, सचदेव त्यागी, शशी धायगुडे आदी उपस्थित होते. या वेळी तेथील रहिवाशांनी हे डम्पिंग ग्राऊंड बंद करून ते दुसरीकडे हलवावे, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे केली आहे. दरम्यान, पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. काही  कामांमुळे स्थानिक नागरिकांना उद्भवत असतात. महापालिकेच्या माध्यमातून या समस्यादेखील सोडविण्याचे कार्य होत असते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply