पनवेल : रामप्रहर वृत्त
कृतज्ञता सप्ताहाची सुरूवात गव्हाणमधील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेने झाली. रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेचा सोहळा झाला असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
स्पर्धेमध्ये रायगड विभागातील रयतच्या शाळां व्यतिरिक्त अन्य शाळांमधूनही स्पर्धक सहभागी झाले. गव्हाण विद्यालयाने या विभागीय पातळीवरदेखील आपली चमकदार कामगिरी कायम राखली. गव्हाण विद्यालयाचे चार विद्यार्थी प्रथम क्रमांक प्राप्त करून विजयी झाले तर तीन विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. एकूण सात विद्यार्थी विजेते ठरले.
पारितोषिक वितरण सोहळ्याला ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य वार. टी. देशमुख, विभागीय अधिकारी रोहिदास पाटील, गव्हाणचे उपसरपंच विजय घरत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, उपमुख्याध्यापक प्रमोद मंडले, पर्यवेक्षिका विशाखा मोहिते, रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे नवनिर्वाचित संचालक किशोर पाटील, रायगड विभागीय कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी कारंडे, विभागीय कार्यालयाचे कार्यालयीन प्रमुख गुजर, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रणिता गोळे आदींच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.
सर्व गटातील भाषा निहाय प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना पुन्हा कृतज्ञता सप्ताहाच्या सांगता समारंभानिमित्त 16 डिसेंबर रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मुख्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.
या स्पर्धेसाठी एकूण 27 परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती आणि सर्व परीक्षक रयत शिक्षण संस्थेच्या बाहेरच्या विविध शाखा व महाविद्यालयातील त्या त्या भाषा विषयांचे तज्ज्ञ अध्यापक आणि प्राध्यापक होते. सर्व परीक्षकांचाही भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.
गव्हाण विद्यालयाने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक सात पारितोषिक जिंकली तर त्या खालोखाल इंग्रजी माध्यमाच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि दत्तूशेठ पाटील इंग्लिश मीडियम स्कूल या कामोठ्यातील दोन शाखांनी प्रत्येकी सहा पारितोषिक जिंकली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे वक्तृत्व विभागाचे स्पर्धाप्रमुख सागर रंधवे, सहायक उज्वला म्हात्रे, प्रसन्न ठाकूर, जे. एच. माळी, स्पर्धेच्या समन्वयक ज्योत्स्ना ठाकूर यांचे नियोजन उपयुक्त ठरले. विभागीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उर्मिला गोंधळी, चारूशीला ठाकूर, प्रा. अर्चना पाटील, प्रणिता पाटील, चित्रलेखा पाटील, द्रोपदी वर्तक, प्रा.राजेंद्र चौधरी, प्रा. माणिकराव घरत, प्रा. राजू खेडकर, संदीप भोईर, देवेंद्र म्हात्रे, जयराम ठाकूर, संपदा म्हात्रे, सुजाता शेलार-चौधरी, अपर्णा देवकुळे, सुयशा पाटील, श्रीमती पालये, कोळी मॅडम धनाजी ठाकूर, जनार्दन खैरे, दयानंद खारकर, अरुण कोळी, जागृती कोळी आदींनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या स्वयंसेवकांनी निर्धारित कामांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला.
गव्हाण विद्यालयाचे विजेते विद्यार्थी
प्रथम क्रमांकाचे मानकरी : गौरी दुर्गाराम चौधरी, आरोही प्रमोद कोळी, किरण संजय जैस्वार, रूपाली वैजिनाथ मंजुळकर; द्वितीय क्रमांकाचे मानकरी : स्मीत कुंदन मोकल, अनुष्का राजेंद्र आव्हाड, निर्मल नागेश मंजुळकर; मार्गदर्शक शिक्षक : मराठी भाषा – हर्षला पाटील, हिंदी भाषा – अस्मिता पाटील – वर्तक, एकनाथ ठाकूर व प्रा. जयवंती ठाकूर, इंग्रजी भाषा – सागर रंधवे, द्रौपदी वर्तक व प्रा. उमेश पाटील